आमच्या विषयी थोडक्यात

संवेदना फाउंडेशन

संवेदना फाउंडेशन ही सेवाभावी संस्था आहे. समाजातील संवेदनशील व सक्षम व्यक्तींनी दिलेल्या यथाशक्ती अर्थसहाय्यातून गरजू व्यक्तींना मदत करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. मुख्यत्वे वैद्यकीय व शैक्षणिक कारणासाठी ही मदत दिली जाते. ही संस्था धर्मादाय आयुक्तांच्या ( चॅरिटेबल कमिशनर) कार्यालयात नोंदवलेली आहे.

संस्थेचा नोंदणी क्रमांक : E-12149 / Thane

पॅन नंबर : ABBTS3009F
अधिक जाणून घ्या

संवेदनाची पार्श्वभूमी व सुरुवातीची वाटचाल

डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिरच्या ८६साली १०वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप गट आहे. वेळोवेळी स्नेहसंमेलने, सहली या निमित्त ते भेटत असतात. २०१७ साली बॅचमधील उमेश बोडस या विद्यार्थ्याने ग्रूपवर आवाहन केले की त्याला किडनी फेल्युअरमुळे नियमित डायलिसिस करावे लागत आहे. यामुळे ज्याला शक्य आहे त्याने आर्थिक मदत करावी. यावर असे ठरले की एक निधी तयार करून त्यातून त्याला दरमहा मदत करावी. बॅचमधील सुमारे ६०-७० जणांनी याला प्रतिसाद देउन सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा निधी तयार झाला. व उमेशला दरमहा मदत करण्यास सुरुवात झाली. दुदैवाने पाच महिन्यांनी आजार बळावून त्याचे निधन झाले. उरलेल्या निधीचा वापर अशाच प्रकारे गरजूंना मदतीसाठी करण्याचे ठरले व त्याप्रमाणे यातून काही विद्यार्थांना मदत करता आली.

अधिक वाचा

देणगी / सहभाग आवाहन


संवेदना फाउंडेशनचा उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सुजाण नागरिकांनी एकत्र येउन समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे हा आहे.

सहभाग व मदतीच्या अर्जाविषयी अधिक माहिती घ्या

अभिप्राय