संवेदना फाउंडेशनचे पदाधिकारी व विश्वस्त -

संस्थेचे कामकाज धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ठरवलेल्या नियमांनुसार सुरू असून सात विश्वस्त ही संस्था चालवतात.

वृषाली पुंडले - अध्यक्ष

ठाणे येथे राहणाऱ्या वृषाली पुंडले मुळच्या डोंबिवलीकर आहेत. बी.एस.सी. (संख्याशास्त्र) ही पदवी तसेच संगणकप्रणाली पदविका प्राप्त करून त्यांनी काही वर्षे बॅंक कर्मचारी म्हणून काम केले आहे. या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर त्या गृहीणी म्हणून घरी आणि उत्साही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समाजात सक्रीय आहेत. संवेदनशीलपणे पण डोळस दक्षपणे योग्य निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव संवेदनाच्या कामात उपयुक्त ठरतो

पूनम खरे - कोषाध्यक्ष

डोंबिवली येथे राहणाऱ्या पूनम खरे कल्याण येथे एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. बी.कॉम.ची पदवी घेतलेल्या पूनम यांनी चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक संस्थेची कार्यकर्ती म्हणून सुमारे १८ वर्षे काम केले आहे. मुद्रीत शोधनाचे काम आवड म्हणून करणाऱ्या पूनम यांचा शुद्ध मराठी वापराविषयी आग्रह असतो.

महेश खरे - सचीव

सर जे जे इंस्टिट्यूट ऑफ ॲप्लाईड आर्टस् मधून बी.एफ.ए.(ॲप्लाईड) ही पदवी मिळवल्यावर डोंबिवली निवासी महेश यांनी काही वर्षे स्वतःचा ॲडव्हर्टायझिंगचा व्यवसाय केला. त्यानंतर १३ वर्षे 'माधवबाग'मध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केले. यातील ११ वर्षे आरोग्य संस्कार या मासिकाच्या संपादन व निर्मितीची जबाबदारी सांभाळली. सध्या ग्रंथाली प्रकाशनाच्या वांद्रे येथील प्रतिभांगण उपक्रमाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या महेश यांना ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन व वृक्षसंवर्धनाची आवड आहे.

दीपाली तांबे - विश्वस्त

आई वडिलांकडून सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या दिपाली तांबे या डोंबिवलीकर आहेत. बी.एस.सी. (मायक्रोबायोलॉजी) ही पदवी घेतलेल्या दिपाली या गृहीणी असून संवेदना फाउंडेशनच्या कामात सदैव पुढे असतात. संवेदना फाउंडेशनकडे वैद्यकीय मदतीसाठी आलेल्या गरजूंशी स्नेहपूर्वक संवाद साधणे ही त्यांची खासियत आहे. त्या संवेदनाच्या निधीसंकलनातही मोलाचा वाटा उचलतात.

डॉ. संजीवनी कुलकर्णी – विश्वस्त (एम्. फार्म; पीएच. डी. टेक.)

युडिसीटी (सध्याची आय.सी.टी.) येथून औषध निर्माण शास्रात पीएच. डी. टेक. नाॅवेल ड्रग डिलीवरी सिस्टीमवर प्रकल्प. गेली वीस वर्षे औषध निर्माण कंपनीं मध्ये विविध स्तरावर कार्यरत. औषध निर्माण संशोधन व विकास विभाग (प्रमुख) व रेग्युलेटरी अफेअर्स यु. एस. ए. फायलिंग्ज विभाग (प्रमुख); संशोधनातून मान्यताप्राप्त 'ग्रांटेड' पेटंट्स. वाचन व संगीताची आवड. सध्या गीताभ्यास चालू व गीता परिवार कार्यकर्ती. संवेदनाच्या माध्यमातून 'देणे समाजाचे' करिता उत्सुक व प्रयत्नशील.

विराज देशपांडे - विश्वस्त

मुळचे डोंबिवलीकर असणारे विराज देशपांडे सध्या घाटकोपर निवासी आहेत. यु.डी.सी.टी. मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर विराज यांनी आय.आय.एम. लखनौ येथून एम.बी.ए. केले आहे. सामाजिक कामात यथाशक्ती सहभागी होणारे विराज सध्या एच.डी.एफ.सी. अर्गो जनरल इन्श्युअरन्स या कंपनीत कार्यरत आहेत.

मनोज वाळींबे – विश्वस्त

सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या मनोज वाळिंबे यांचा गेल्या १९ वर्षांपासून स्वतःचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांना सामाजिक कामाची आवड असून विविध सामाजिक, धार्मिक कार्यांमध्ये ते यथाशक्ती आर्थिक व व्यवस्थापकीय साहाय्य करत असतात. सातारा येथील कुमठे गावातील हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धारामध्ये त्यांनी महत्त्वाचा आर्थिक व व्यवस्थापकीय वाटा उचलला आहे.